माठातले पाणी दूर करते आर्थिक समस्या, बघा कसे ते..

नमस्कार मित्रांनो, पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरात पाणी पिण्याचे माठ होते. उन्हाळा पावसाळा हिवाळा वर्षांचे बाराही महिने प्रत्येक घरात माठातील पाणी पिण्याची सवय होती आणि या पाण्यामुळे कधीही कुणाला सर्दी-पडसे होत नव्हते.

नंतर घरोघरी फ्रीज आले त्यानंतर पाण्याच्या बाटल्या फ्रिज मध्ये भरून ठेवल्या जाऊ लागल्या आणि ते पाणी पिण्यास सुरुवात झाली. आता प्युरिफायर आले आहे, ज्यामुळे लोक डायरेक्ट नळाचं पाणी देतात.

परंतु जी मजा माठाचे पाणी पिण्यात होती ती कशातच नाही. उन्हातून आल्यानंतर एक तांब्या माठातील पाणी पिलं तर तहान भागते. आजही ग्रामीण भागात घरोघरी मातीचे माठ असतात आणि त्यातलं पाणी सर्व लोक पितात. शक्यतो उन्हाळ्यात ठेवलेले माठ शोधून काढले जातात आणि मग त्याचा वापर केला जातो.

मंडळी घरात माठ भरून ठेवण्याचा वास्तुशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. घरात भरून ठेवलेला माठ हा घराच्या भरभराटीसाठी तसेच घराच्या समृद्धीसाठी देखील मोठी कामगिरी बजावतो. चला तर मग जाणून घेऊया की वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्याचे काय महत्त्व आहे.

वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या माठा मुळे घरातील अडीअडचणी आणि संकट सहज दूर होते. आपल्या संकटांचे निराकरण करण्याचे कार्य माठा मार्फत होत असते. असं म्हणतात आपल्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात पितरांचा वास असतो आणि जर ते पाणी भरून ठेवले नाही तर आपले पित्र कुठे वास करतील.

पूर्वीच्या काळी दररोज माठातील एक तांब्या पाणी घेऊन ते महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांना अर्पण केले जात होते, त्यामुळे आपल्या घरातील पितृदोष आपोआप बाहेर पडत असे.

पितृ दोष असल्यामुळे घरातील कार्यात अडचणी येत राहतात. भांडण होत राहतात. परंतु ते आपल्याला कळत नाही. जर आपण घरात माठ भरून ठेवतो तर तो नेहमी घराच्या उत्तर दिशेला असावा कारण पिण्याच्या पाण्याची दिशा उत्तर आहे.

पाण्याचा माठ किंवा हंडा मोकळे होऊ देऊ नये. माठातील कमी पाणी देखील घरातील वाद-विवाद भांडण-तंटे यांचे कारण ठरू शकते. असं मानला जात घरात जर कोणाला ताण तणाव किंवा दडपण वाटत असेल तर अशा व्यक्तीने माठातील एक तांब्या भरून घ्यावा आणि सलग आठ दिवस एखाद्या वृक्षाला जाऊन ते पाणी घालावं.

यामुळे व्यक्तींचा तणाव दडपण दूर होते आणि म्हणूनच घरात एक तरी मातीचा माठ असणं आवश्यक आहे. माठातलं पाणी पिल्यामुळे घरातल्यांच आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. पाणी पिण्याचा माठ जर घरांमध्ये योग्य दिशेला ठेवला असेल तर तिथे कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही.

तसेच पाणी पिण्याचा माठ योग्य दिशेला योग्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातला वास्तुदोष सुद्धा नाहीसा होतो आणि माठातलं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा भरपूर आहेत. मग असा आरोग्यदायी माठ जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर तो कोणत्या दिवशी खरेदी करावा? तसंच घरातल्या कोणत्या दिशेला हा माठ ठेवावा.

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माठ खरेदी करण्याचा शुभमुहूर्त शुभ दिवस कोणता आहे? तर तुम्ही कोणत्याही सोमवारी चांगला दिवस पाहून माठ खरेदी करू शकतात. ज्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करणार त्या दिवशी तो साध्या पाण्याने भरून ठेवा नंतर त्याची पूजा करा आणि मग दुसर्या दिवशी तो माठ पिण्याच्या पाण्याने भरा

. हा माठ योग्य दिशेला ठेवणे सुद्धा तितकच महत्त्वाच आहे. कारण तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याच बरोबर घरात काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात. वास्तुशास्त्रानुसार पिण्याच्या पाण्याचा माठ जर तुम्ही ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवला तर त्याचे तुम्हाला चांगले लाभ दिसून येतात.

तसच घरात सकारात्मक ऊर्जा ही चांगली राहते. त्याचबरोबर घरात पैशाची कमतरता होत नाही. माठ कधीच रिकामा ठेऊ नका हे सुद्धा तितकच महत्त्वाच आहे. कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला असावा.

मातीच्या वस्तू वापरणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक ठरतं. वास्तुशास्त्रात मातीच्या भांड्यांचे महत्त्व सांगितले गेले आहे की वास्तुशास्त्रामध्ये मातीपासून बनवलेल्या काही गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे त्या जर तुम्ही घरात ठेवल्या तर तुम्ही भाग्यवान होऊ शकता. कोणत्या आहेत मग त्या वस्तू चला जाणून घेऊया.

त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर आहे मातीच्या मूर्तीं. घरातील मंदिरात नेहमी मातीच्या मूर्ती ठेवाव्यात असे म्हणतात. देवघरात किंवा घरात देवाची एखादी सुंदर रेखीव मातीची मूर्ती असेल ती मूर्ती घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करेल. सहसा लोक पूजेच्या खोलीत धातूचे दिवे वापरतात पण वास्तुशास्त्रानुसार मातीचा दिवा लावणे शुभ असते.

असे केल्याने घरात सुख समृद्धी येते. असे म्हणतात ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील अशा लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेल घातलेला मातीचा दिवा प्रज्वलित करावा त्यामुळे लाभ होतो. लहान मुलांनासुद्धा मातीच्या खेळण्या तसेच मोठ्यांनी देखील मातीच्या भांड्यात पैसे जमा केले तर धनप्राप्ती होते.

जीवनात काही अडचणी असतील किंवा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कृष्णाच्या प्रतिमेसमोर मातीचा तेल घातलेला दिवा प्रज्वलित करावा. ज्यांच्या घरात मातीचा माठ वापरला जातो त्या घरात भरभराट होते असे म्हणतात. त्या घरावर चंद्र आणि बुध ग्रहांची अनुकूलता राहते, धन्यवाद.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.